काल मध्यरात्री चीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. चीनमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता ७.२ रिश्टर स्केल इतकी होती. तिथे आलेल्या भूकंपाचे धक्के इतके मोठ्या प्रमाणात होते की, त्याची तीव्रता राजधानी दिल्लीपर्यंत होती. या भूकंपाचे धक्के दिल्ली-एनसीआर भागात जाणवले. सोमवारी रात्री दिल्लीच्या नागरिकांना देखील भूकंपाचे धक्के जाणवले. तीव्रता जास्त असल्याने आणि अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने नागरिकांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली.
भूकंपाचा केंद्रबिंदू हा चीनमधील दक्षिणेकडील शिनजियांग या ठिकाणी होता. भूकंपाची तीव्रता ७.२ रिश्टर स्केल इतकी होती. चीनमध्ये सोमवारी मध्यरात्री जोरदार भूकंप झाला. जमिनीपासून ८० किलोमीटर खाली याचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान संस्थेने याबाबत माहिती दिली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ-चीन सीमेजवळ असल्याचे सांगण्यात येत आहे.
चीनमधील शिन्हुआनं या अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील दक्षिण शिनजियांग भागामध्ये ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. स्थानिक वेळेनुसार, मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा भूकंप झाला. याआधी देखील राजधानी दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचे केंद्रबिंदू लांब असले तरी दिल्लीमध्ये असे धक्के सारखे जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे.