मराठा आरक्षणासाठी एल्गार उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा पुण्यात दाखल झाला आहे. येत्या २६ जानेवारी रोजी मुंबईत तब्बल तीन कोटी मराठे येतील असा जरांगे पाटलांचे म्हणणे आहे. २० जानेवारीपर्यंत आरक्षण न दिल्यास मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला होता. मात्र दिलेल्या मुदतीत आरक्षणाचा तिढा न सुटल्याने जरांगे पाटलांनी मुंबईकडे कूच केले आहे. आज त्यांचा भव्य मोर्चा पुण्यनगरीत दाखल झाला आहे.
पुणेकरांनी कडाक्याची थंडी असताना देखील मोठ्या उत्साहात जरांगे पाटलांचे पुण्यात स्वागत करण्यात आले. थंडीची तमा न बाळगता रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत लोकांनी त्यांचे स्वागत केले. मनोज जरांगे पाटील हे सकाळी वडूज या ठिकाणी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले. अगदी लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वानीच रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
जरांगे पाटील यांनी सुरु केलेला मोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी हजारो स्वयंसेवक काम करताना दिसून येत आहे. रस्त्यावर वाहुतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. आज जरांगे पाटलांची पदयात्रा सांगवी फाटा येथे दाखल झाल्यानंतर त्यांचा मोर्चा आज लोणावळा येथे मुक्कामी असणार आहे.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी संयम रखवा , सरकार आरक्षणासाठी काम करत आहे, संयम राखा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केले आहे. तसेच राज्यात आतापर्यंत ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. राज्याचे मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप तात्काळ वाटप करण्याचे आदेश दिले आहेत.