केंद्रातील मोदी सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत करायचे या उद्देशाने देशातील सर्व विरोधक एकत्रित आले होते. या सर्वांच्या आघाडीला त्यांनी ‘इंडिया’ आघाडी असे नाव दिले आहे. मात्र या ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का मानला समजला जात आहे.
दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आमची इंडिया आघाडी मजबूत असून, केंद्र सरकारविरोधात ताकदीने निवडणूक लढणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता तृणमूल काँग्रेस पक्ष पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. यासंदर्भात ममता बॅनर्जी यांनी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाशीही युती करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या-ज्या- वेळेस इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपावर चर्चा झाली त्या-त्या वेळेद ममता बॅनर्जी या जागा देण्यासाठी फारशा इच्छुक नव्हत्या.
केंद्रातील मोदी सरकारला हरवण्यासाठी देशातील सर्व विरोधक एकत्रित आल्याचे पाहायला मिळत आहे. काहीही करून मोदी सरकारला पराभूत करायचेच या निर्धनराने सर्व विरोधक इंडिया आघाडीखाली एकत्रित आले आहेत. मात्र ममता बॅनर्जी यांच्या घोषणेमुळे विरोधकांच्या एकजुटीला मोठा सुरुंग लागलेला पाहायला मिळतो आहे. आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस लोकसभेच्या ४२ च्या ४२ जागा लढवणार आहे. काँग्रेसने माझा कोणताही ही प्रस्ताव मान्य केला नाही असे बॅनर्जी म्हणाल्या आहेत. दरम्यान, याआधी पाटणा,बंगळुरू आणि मुंबई येथे इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या महत्वाच्या बैठकी झाल्या होत्या. यावेळी राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण देखील तृणमूल काँग्रेसला मिळाले नसल्याचे देखील तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे.