पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये भव्य अशा राम मंदिराचे लोकार्पण केले. तसेच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना देखील करण्यात आली. अयोध्येतील या सोहळ्यासाठी अनेक व्हीआयपी, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक आणि अन्य क्षेत्रांमधील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. तसेच या सोहळ्याचे निमंत्रण राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मंत्र्यांना देण्यात आले होते. मात्र सोहळ्याआधी अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या जाणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता ५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राज्याचे सर्व मंत्रिमंडळ अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत.
दरम्यान, २२ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे लोकार्पण केले. आता ५ फ़ेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहेत. अयोध्या येथे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी भाजपाने आपला मेगा प्लॅन तयार केला असल्याचे म्हटले जात आहे. भाजपाशासित सर्व राज्यांमधील मंत्रिमंडळ अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. अयोध्येत राम मंदिर सर्व सामान्यांसाठी खुले झाल्यानंतर अयोध्येत भाविकांनी अलोट गॅरी केली आहे. दरम्यान , मंदिर परिसर सुरक्षा वाढवण्यात आली असून, भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.