रामलल्ला मुर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मंदिर ट्रस्टने सुचवलेल्या धर्मशास्त्र नियमाला अनुसरून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी तब्बल अकरा दिवस केलेल्या उपवासाची उबाठा नेते उद्धवजी ठाकरे आणि खा.संजय राऊतांनी नाशिकच्या पवित्र तीर्थक्षेत्रावरून जाहिर सभेत चेष्टा करत सनातन हिंदु धर्माच्या धर्मशास्त्र संस्कृतीचा अपमान केल्याची टिका भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे .
प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, 22 जानेवारी रोजी आयोध्येत प्रभु रामलल्ला मुर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अकरा दिवसाचे उपवास अनुष्ठान केले. दरम्यानच्या काळात त्यांनी विदेशात कुठेही दौरे न करता देशांतर्गत पवित्र तीर्थक्षेत्राला भेटी देताना रावणाच्या लंकेला जाण्यासाठी संत हनुमानाच्या वानरसेनेने सेतु बांधला. त्या पवित्र सागर किनार्याला देखील त्यांनी भेट दिली. वास्तविक पहाता प्राणप्रतिष्ठा ज्यांच्या हातुन होणार आहे त्यांच्यासाठी धार्मिक आचारसंहिता असते आयोध्या मंदिर ट्रस्टने पंतप्रधानाला काही गोष्टी सुचविल्या देखील होत्या. पण ज्यांचं जीवन तपस्वी आणि भारतीय हिंदु संस्कृतीचं जतन करणारं त्या पंतप्रधानांनी तीन दिवसाचे उपवास अनुष्ठान सांगितले असता अकरा दिवसाचे केले. उपवास खरं तर धर्मशास्त्रात अत्यंत महत्वाचे तपस्वी साधन म्हणुन ओळखल्या जाते.
नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे उपवास तर कुणी पशुपती व्रत करते. संकट चतुर्थी कुणी करतं तर हरितालिकेला देखील उपवास करते. सुर्यनारायणाचे उपवास देखील पाळल्या जातात. आषाढी एकादश असेल किंवा पंधरवाडी एकादश एवढेच नव्हे तर आठवड्यातले सारेच वार वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धेनुसार भाविक भक्त करतात. हिंदु संस्कृतीमध्ये रूढी परंपरेनुसार हा श्रद्धेचा भाग म्हणुन ओळखल्या जातो. प्रभु रामचंद्र वनवासात असताना देखील चौदा वर्षे त्यांनी केवळ फळ, कंदमुळे खावुन उपवास केले. उबाठा शिवसेनेचं काल नाशकात अधिवेशन संपन्न झालं. ज्या उबाठा नेत्यांनी काळाराम मंदिरात जावुन दर्शन घेताना पवित्र स्थानावरून राजकिय लढाईची सुरूवात केली त्याच उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊतांनी जाहिर सभेत पंतप्रधानाच्या उपवास तपश्चर्याची चेष्टा करून खर्या अर्थाने हिंदु संस्कृतीचा, राम भक्तांच्या श्रद्धेचा अपमान केल्याची टिका प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी केली आहे .
वास्तविक पहाता ज्यांना कधीच श्रद्धा आणि उपवासाच्या गोष्टी माहिती नसतात, ज्यांनी कधी आषाढीला देखील व्रत वैकल्ये केले नाही, एवढेच काय जी मंडळी आज आयुष्यभर भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावुन बसली त्यांना आता केवळ मताच्या लाचारीसाठी हिंदु धर्माच्या उपवास श्रद्धेवर घाला घालुन आम्ही कसे धर्मनिरपेक्षवादी असल्याचे दाखवावं लागतं हेच खऱ्या अर्थाने दुर्दैव म्हणावे लागेल.
खा.संजय राऊत बोलण्यात नॉन व्हेज म्हणुन ओळखले जातात. त्याहुन अधिक खाण्यापिण्यात मांसाहारी असलेल्या आणि केवळ राजकिय टिका करायची म्हणुन बेताल बडबड करणार्यांची मानसिकता खऱ्या अर्थाने कुठलाही नैतिक अधिकारच त्यांना बोलण्याचा असु शकत नाही. देशाच्या सर्वोच्च संविधान पदावर बसलेल्या व्यक्तीविषयी काय बोलावं?याचे भान ज्यांना नाही अशांची वायफळ बडबड म्हणजे आदर्शहिन नेतृत्वाच्या अंगी आलेले उसणं बळच म्हणावे लागेल या शब्दांत कुलकर्णी यांनी उबाठा नेत्यांना ठणकावले आहे .