देशामध्ये यंदा लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. केंद्रातील मोदी सरकाने पुन्हा एकदा सरकार आणण्याच्या दृष्टीने आणि मोदी सरकारला काहीही करून पराभूत करण्याच्या दृष्टीने विरोधक कामाला लागले आहेत. मोदी सरकार पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून विरोधकांनी एकत्रित येत ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली आहे.
दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आम आदमी पक्ष पंजाबमधील लोकसभेच्या एकूण १३ जागा जिंकेल आसा विश्वास व्यक्त केला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी ”आम आदमी पक्षाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंजाबमध्ये १३ जागा मिळतील”, असे सांगितले. यंदाच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाच्या चर्चेदरम्यान, भगवंत मान यांनी हे विधान केले आहे. भगवंत मान यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दोन्ही पक्षांमधील जागावाटपाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. पंजाब राज्यात लोकसभेच्या एकूण १३ जागा आहेत. तसेच आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस हे दोघेही ‘इंडिया’ आघाडीचे भाग आहेत.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जीं यांनी लोकसभा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कोणाशीही युती करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे,