पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. वर्धमान येथील एका बैठकीतून परतत असताना हा अपघात झाला आहे. अपघातादरम्यान कारचा अचानक ब्रेक लागल्याने ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी एका बैठकीवरून कोलकाताला परतत असताना हा अपघात घडला आहे. ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अचानक ब्रेक लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत. रस्त्यावर उंच ठिकाणी आल्यानंतर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने ममता यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर त्यांना SSKM रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, वर्धमान बैठकीआधी ममता बॅनर्जी एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार होत्या. त्यानंतर त्या हेलिकॉप्टरने कोलकाताला परतणार होत्या. मात्र, खराब वातावरणामुळे त्यांना हॅलिकॉप्टरने घेऊन न जाता त्यांना रस्ते मार्गाने कारने घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरच प्रवासादरम्यान ही अपघाताची घटना घडली आहे.