बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आज घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पोहोचली आणि तिने भगवान शंकराचे दर्शन घेतले. सध्या साराचे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
साराने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला भेट दिलेले तिचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली असून त्यावर त्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. सारा ही महादेवाची भक्त मानली जाते आणि ती नेहमी भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी मंदिरांमध्ये जाते.
यावेळी साराने महाराष्ट्रातील वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले आहे. याचे फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘जय भोलेनाथ’. अलीकडेच सैफ अली खानवर ट्रायसेप्स सर्जरी झाली आहे. त्यामुळे वडिलांना बरे वाटावे म्हणून सारा महादेवाच्या मंदिरात गेल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, सारा लवकरच अनुराग बसूच्या ‘मेट्रो…दे डेज’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.