गेले एक ते दोन वर्षे रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरु आहे. बलाढ्य रशियाला युक्रेनला अजून नमवता आलेले नाही. त्यातच आता युक्रेनचे युद्धबंदी असलेले रशियाचे विमान विमान सकाळी ८ वाजता कोसळले आहे. आयएल-76 हे मालवाहतूक करणारे विमान युक्रेनच्या सीमेजवळील पश्चिम बेलग्रूड भागात कोसळल्याची माहिती रशियन वृत्तसंस्थेने दिली आहे. युक्रेनचे युद्धबंदी असलेले रशियाचे विमान विमान सकाळी ८ वाजता कोसळले आहे. आयएल-76 हे मालवाहतूक करणारे विमान युक्रेनच्या सीमेजवळील पश्चिम बेलग्रूड भागात कोसळल्याची माहिती रशियन वृत्तसंस्थेने दिली आहे. ही घटना युक्रेन देशाच्या सीमेजवळ असणाऱ्या कोरोचा जिल्ह्यात घडली आहे. या विमानातील ७६ जणांचा मृत्यू झाला आहे.
”२४ जानेवारी रोजी इल्युशिन-76 हे माल वाहतूक करणारे विमान मास्कोमधील वेळेनुसार सकाळी ११ वाजता नियोजित उड्डाण केल्यानंतर बेल्गोरोड प्रदेशात कोसळले. या विमानात ६५ युक्रेनचे युद्धबंदी होते. त्यांना बेल्गोरोड प्रदेशात हलवले जात होते”,असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने TASS चा हवाला देत सांगितले.
या अपघाताबद्दल रशियाने केलेल्या दाव्याबद्दल युक्रेन या घटनेची चौकशी करत असल्याचे वृत्त CNN ने दिले आहे. तथापि, अधिकृत युक्रेन युक्रेनियन माहिती सेवेने कीव सैन्यातील सूत्रांचा हवाला देऊन दावा केला आहे की सोव्हिएत काळातील लष्करी विमान रशियन S-300 हवाई संरक्षण प्रणालीसाठी क्षेपणास्त्रे वाहून नेत होते. मात्र या दोन्ही डाव्यांची पुष्टी केली नसल्याचे CNN ने सांगितले.