अहमदनगर : अहमदनरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नुकताच मराठा समाजाच्या सर्वेक्षणादरम्यानचा सावळा गोंधळ समोर आला आहे. चक्क पहिली पास असलेल्या चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठीची जबाबदारी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर सध्या सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या या कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी पहिली पास असलेल्या कर्मचाऱ्याची नियुक्ती केल्याचे समोर आले आहे. या कर्मचाऱ्याची नियुक्ती अहमदनगर महानरपालिकेकडून करण्यात आली आहे. सध्या या कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो कर्मचारी आपले शिक्षण कमी असल्यामुळे आपल्याला सर्वेक्षणाचे काम करता येत नसल्याची कबुली देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणात प्रशासनाचा सतत गोंधळ पाहायला मिळत आहे. सर्वेक्षणाच्या पहिल्याच दिवशी सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल एप्लीकेशनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे कामकाज ठप्प पडले होते. तर आता पहिली पास असलेला व्यक्ती सर्वेक्षण करत असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, सर्वेक्षण करणाऱ्या या कर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मराठा समाजाकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे