कुख्यात गुंड शरद मोहोळ याची ५ जानेवारीला पुण्यातील कोथरूड परिसरात गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून खेड शिवापूर या ठिकाणी आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी १० आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आता शरद मोहोळ प्रकरणातील आरोपी विठ्ठल शेलार व रामदार मारणे यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील सूत्रधार अजूनही पोलिसांच्या ताब्यात आला नसू, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आरोपी विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तसेच यावेळी पोलिसांनी त्या दोघांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली. दरम्यान, या खून प्रकरणातील एका आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. शरद मोहोळ प्रकरणात शेलार आणि गणेश मारणे हे दोन मुख्य आरोपी आहेत.
दरम्यान, ५ जानेवारी रोजी लग्नाच्या वाढदिवसाच्याच दिवशी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही घटना पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये घडली. त्यानंतर शरद मोहोळ यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुणे पोलीस आणि गुन्हे शाखे अत्यंत वेगाने तपास करून आरोपींना पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर या भागांमध्ये अटक केली.