22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या खास सोहळ्यात 500 वर्षांनंतर रामलल्लाला अखेर भव्य मंदिरात विराजमान करण्यात आले. त्यानंतर आता पुढील महिन्यात आणखी एका भव्य हिंदू मंदिराचे उद्घाटन होणार आहे.
या मंदिराचे उद्घाटन 14 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. UAE मधील अबुधाबीमध्ये भव्य स्वामीनारायण मंदिर तयार झाले आहे. अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक झाल्यानंतर आता अबुधाबीमध्ये बांधलेल्या मंदिराचे उद्घाटन होणार आहे. भारतातील UAE चे राजदूत अब्दुल नासेर अलशाली म्हणाले की, मंदिराच्या उद्घाटनाचा दिवस सहिष्णुता आणि स्वीकार्यता साजरा करण्यासाठी खूप खास असेल.
हे अबू धाबीचे पहिले हिंदू मंदिर आहे, जे 14 फेब्रुवारी रोजी उघडणार आहे. हे मदिर अल वाक्बा या ठिकाणी 20,000 चौरस मीटर जागेवर बांधले गेले आहे. या मंदिराची रचना अतिशय आधुनिक शैलीत करण्यात आली आहे.
प्राचीन आणि पाश्चात्य स्थापत्यकलेचा मिलाफ करून बनवलेल्या या मंदिराचे कोरीव काम अतुलनीय आहे. हे मंदिर शाही, पारंपारिक कोरलेल्या दगडांनी बांधले आहे. तर आता या मंदिराच्या उद्घाटनाची अबुधाबीमध्ये जोरात तयारी सुरू आहे.