भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि संपूर्ण संघ 246 धावांत ऑलआऊट झाला. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावांची खेळी खेळली. तर भारतीय गोलंदाजांनी 8 विकेट घेत इंग्लंडचा डाव अवघ्या 246 धावांतच गुंडाळला.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि संपूर्ण संघ 246 धावांत गडगडला. कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावांची खेळी खेळली. जॉनी बेअरस्टो (37), बेन डकेट (35), जो रूट (29), टॉम हार्टली (23), झॅक क्रॉली (20), रेहान अहमद (13), मार्क वुड (11), बेन फॉक्स (4) आणि ओली पोप एका धावेचे योगदान दिले.
हैदराबाद कसोटीत इंग्लंडच्या पहिल्या डावात भारतीय फिरकी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. फिरकीपटूंनी एकूण आठ विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी 3 बळी घेतले. तर अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी 2-2 असे बळी घेतले. पहिल्या सत्रात 3 विकेट, दुसऱ्या सत्रात 5 विकेट आणि तिसऱ्या सत्रात 2 विकेट पडल्या.
टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड संघाची प्लेईंग इलेव्हन
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जॅक लीच.