भारताच्या उद्याच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळयाचे प्रमुख पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज दुपारी जयपूरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे स्वागत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा आणि मुख्यमंत्री भजनलाल उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मॅक्रॉन एकत्र जंतर-मंतर आणि जयपूरचा हवा महाल अशा काही पर्यटन स्थळांना भेट देणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार जयपूरमध्येच दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक होणार आहे. मोदी-मॅक्रॉन जयपूरमध्ये रोड शोही करणार आहेत.
मॅक्रॉन रात्री दिल्लीला रवाना होतील. उदय 26 जानेवारी रोजी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून राष्ट्रपती भवनात मॅक्रॉन यांच्या सन्मानार्थ रिसेप्शन आणि स्टेट डिनरचे आयोजन करण्यात येणार आहेत. मॅक्रॉन हे भारतातील प्रजासत्ताक दिन परेडचे प्रमुख पाहुणे असणारे फ्रान्सचे सहावे राष्ट्राध्यक्ष असतील.