पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) आवारात एका विद्यार्थी संघटनेने अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याच्या दिवशी बाबरी मशीद पाडल्याच्या निषेधार्थ फलक लावल्याने तणाव निर्माण झाला होता.फलक लावण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर मंगळवारी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
अखेर हा फलक हटविण्यात आल्याने तणाव निवळला.मात्र त्या नंतर करण्यात आलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी ‘एफटीआयआय’मधील विद्यार्थी संघटनेच्या सात पदाधिकाऱ्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल करत काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले होते. त्यांना आज तात्पुरता अटकपूर्व जामीन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सायनतन चरण चक्रवर्ती, नाथन चक्रपाध्याय, मनकलन चक्रवर्ती, त्रिशा बंदना मन्ना, मधुरिमा मगन्का मैती, मनकप सेलोन नोकवोहम, रितागनिकी देबारती भट्टाचार्या अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.