प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपूर मेट्रोने तिकीट दरात 30 टक्के सवलत जाहीर केली आहे . राजपत्रित सुट्ट्यांच्या दिवशी नागपूर मेट्रो आपल्या प्रवाशांना अशी सवलत देते. याच शृंखलेत तिकीट दरात ही सवलत देण्यात आली आहे.
यासंदर्भात माहिती देताना नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुटीच्या दिवशी 30 टक्के सवलत मिळाल्याने मेट्रो प्रवाश्यांना फिरणे अधिकच सोपे होणार आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाला जास्तीत जास्ती नागरिकांनी मेट्रो सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महा मेट्रोच्या वतीने करण्यात आले आहे.
यासोबतच मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नागपुरात गेल्या काही दिवसात महामेट्रोच्या महाकार्डचा वापर वाढला आहे. महाकार्डने प्रवास करण्याऱ्या प्रवाश्याला 10 टक्के सवलत दिली जात आहे. या सवलतीचा लाभ प्रवासी वर्ग सातत्याने घेत असून महा कार्डचा वापर देखील या निमित्ताने वाढला आहे. महा कार्डमुळे प्रवासी भाड्यात सवलत तर मिळतेच पण या शिवाय तिकीट काढण्याची गरज पडत नसल्याने वेळ देखील वाचतो.