राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना संबोधित केले.यंदाचा प्रजासत्ताक दिन हा अनेक अर्थांनी राष्ट्राच्या वाटचालीतील एक ऐतिहासिक क्षण ठरलेला आहे, असे राष्ट्रपती मुर्मू यावेळी म्हणाल्या . हा ७५ वा प्रजासत्ताक दिवस हा ऐतिहासिक पल्ला आहे. अयोध्येच्या राम मंदिराचे लोकार्पण ही महत्वाची घटना घडलेला हा एक युगप्रवर्तक कालखंड आहे.जेव्हा भविष्यात या घटनेचा विचार केला जाईल तेव्हा इतिहासकार भारताच्या सभ्यतेच्या वारशाच्या निरंतर शोधातील एक युगप्रवर्तक घटना असा त्याचा अर्थ लावतील.तसेच हे मंदिर केवळ लोकांची श्रद्धाच व्यक्त करत नाही तर आपल्या देशवासीयांच्या न्यायप्रक्रियेवर असलेल्या अपार श्रद्धेचाही पुरावा आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या आहेत. .
तसेच आज आपल्या मूलभूत सिद्धांतांना आठवण करण्याचा योग्य क्षण आहे, असे त्या म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रपतींनी या वर्षात घडलेल्या महिला विधेयक, जी-२० शिखर परिषद आणि कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देणे अश्या महत्वाच्या घटनांचाही आपल्या भाषणात उल्लेख केला.
राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या, “प्रजासत्ताक दिवस म्हणजे आपल्या मुलभूत मूल्यांचे आणि तत्त्वांचे स्मरण करण्याचा प्रसंग असून .जेव्हा आपण त्यापैकी कोणत्याही एका तत्त्वाचं चिंतन करतो, तेव्हा आपोआपच तत्त्वांची दिशाही आपल्याला मिळते. तसेच संस्कृती, श्रद्धा आणि रीतीरिवाजांची विविधता आपल्या लोकशाहीतून ध्वनित होते. विविधता साजरी करण्यातून समता ध्वनित होते, आणि त्या समतेला न्यायाचा आधार असतो.अर्थात हे सगळे स्वातंत्र्यामुळे शक्य होऊ शकते. या सर्व मूल्यांची आणि तत्त्वांची समग्रता हीच आपल्या भारतीयत्वाचा पाया आहे.
आपला देश स्वातंत्र्याच्या शतकाकडे वाटचाल करत आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, हा परिवर्तनाचा काळ आहे.आपल्या देशाला नव्या उंचीवर नेण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. आमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असेल.यासाठी देशवासियांनी संविधानात दिलेली आपली मूलभूत कर्तव्ये पाळावीत. ही कर्तव्ये म्हणजे भारताला स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होईपर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या प्रत्येक नागरिकाच्या आवश्यक जबाबदाऱ्या आहेत,असेही त्यांनी नमूद केले.
आजचा भारत आत्मविश्वासाने पुढे जात आहे. मजबूत आणि निरोगी अर्थव्यवस्था हे या आत्मविश्वासाचे कारण आणि परिणाम आहे.अलिकडच्या वर्षांत भारताचा जीडीपी वाढीचा दर प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक राहिला आहे.सर्वसमावेशक विकास करण्यासाठी सुविचारित लोककल्याणकारी मोहिमांना चालना देण्यात आली आहे. महामारीच्या काळात सरकारने समाजातील दुर्बल घटकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची व्याप्ती वाढवली होती. नंतर,लोकसंख्येतील असुरक्षित घटकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी या कल्याणकारी योजना सुरू ठेवण्यात आल्या आहेत.हा पुढाकार घेऊन सरकारने पुढील पाच वर्षांसाठी ८१ कोटींहून अधिक लोकांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.