देशभरात आज मोठ्या उत्साहात ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. आज आपल्या स्वतंत्र भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन आहे. थोड्याच वेळात कर्तव्यपथावर भारतीय सैन्य दले आपल्या ताकदीचे प्रदर्शन करणार आहेत. भारतीय वायुसेना, नौदल आणि लष्कराच्या तुकड्या या संचलनात सभागी होणार आहेत. तसेच वायुकांची अनेक विमाने, लढाऊ विमाने कसरती दाखवून या परेडला सुरुवात करतील. तत्पूर्वी पंतपधान नरेंद्र मोदींचे कार्टीवपथावर आगमन झाले. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सैन्य दलांचे सैन्य प्रमुखांनी मोदींचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली. त्या ठिकाणी त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
प्रजासत्ताक दिन खास असण्याची शक्यता आहे. भरात आपल्या आधुनिक हत्यारांचे प्रदर्शन या परेडमध्ये करण्याची शक्यता आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरम्यान ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करून या शुभेच्छा दिल्या. एक्स वरील पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!”
प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने दिवसेंदिवस सशक्त होत जाणारी भारताची सैन्य शक्ती पाहायला मिळेल. सुरुवातीला वायू दलातील विमाने, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर अनेक कसरती दाखवून आजच्या परेडला सुरुवात करतील. या परेडमध्ये भारताकडे असणाऱ्या आधुनिक शस्त्रास्त्रांसह विविध राज्यांचे चित्ररथ पाहायला मिळतील. तसेच यंदाच्या परेडमध्ये महिलांची तुकडी देखील आपल्याला संचालन करताना दिसणार आहे. दरम्यान, ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये जमिनीपासून आकाशापर्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तब्बल १४ हजार जावं सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. तसेच राजधानी दिल्लीच्या सीमा देखील सील करण्यात आल्या आहेत.