आज आपल्या देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमिताने भारताच्या प्रथम नागरिक आणि संरक्षण दलांच्या प्रमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ध्वजारोहण करून कर्तव्यपथावरील आजच्या परेडला सुरुवात केली. याआधी कर्तव्यपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे स्वागत केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ध्वजारोहण केले. कर्तव्यपथावरील परेडचे सुरुवात कलाकारांनी ११२ वाद्ये वाजवून केली. यानंतर MI-17 हेलिकॉप्टर हवाई कसरतींचे प्रदर्शन केले. राष्ट्रध्वजासह नौदल, लष्कर आणि वायुसेनेचे झेंडे फडकवत परेडचे सुरुवात करण्यात आली.
परेडला सुरुवात झाल्यानंतर सर्वात प्रथम घोडदळाने आणि त्यानंतर T-90 रणगाड्यातील लेफ्टनंट फैज सिंग यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलामी दिली. या रणगाड्याला भीष्म नावानेही ओळखले जाते आणि हे भारतीय लष्कराचे धोकादायक शस्त्र आहे. त्यामागे भारतीय बनावटीचे नाग क्षेपणास्त्र धावत होते यंदाचा प्रजासत्ताक दिन खास आहे. भरात आपल्या आधुनिक हत्यारांचे प्रदर्शन या परेडमध्ये केले जाणार आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरम्यान ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करून या शुभेच्छा दिल्या. एक्स वरील पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!”