आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाची सुरुवात कर्तव्य पथ येथे राष्ट्रध्वज फडकवून केली आहे .
त्यानंतर राष्ट्रगीत वाजवण्यात आले आणि राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी देण्यात आली.21 तोफांची सलामी हा कर्तव्य पथवरून राष्ट्रध्वजाला दिला जाणारा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे.
दिल्लीमध्ये होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे यंदाचे प्रमुख अतिथी आहेत. ते भारताच्या राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्यासोबत ऐतिहासिक अशा बग्गीमध्ये कर्तव्यपथावर दाखल झाले
105 हेलिकॉप्टर युनिटच्या चार Mi-17 IV हेलिकॉप्टरने कर्तव्यपथावर उपस्थित प्रेक्षकांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. यानंतर ‘आवाहन’ हा नारी शक्तीचे प्रतीक असलेल्या 100 हून अधिक महिला कलाकारांनी विविध प्रकारची तालवाद्ये वाजवत बँड परफॉर्मन्स सादर केला.
871 फील्ड रेजिमेंट (SHINGO) माजी HQ 36 आर्टिलरी ब्रिगेडच्या सेरेमोनियल बॅटरीने तोफांची सलामी दिली. सेरेमोनियल बॅटरीचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल विकास कुमार, एस.एम.यांनी केले.
गन पोझिशन ऑफिसर सुभेदार (एआयजी) अनूप सिंग आहेत. 21 तोफांची सलामी 105 मिमीच्या भारतीय फील्ड गन या स्वदेशी तोफा प्रणालीने कर्तव्यपथावर देण्यात आली.