नवी दिल्ली : आज आपल्या देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमिताने भारताच्या प्रथम नागरिक आणि संरक्षण दलांच्या प्रमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ध्वजारोहण करून कर्तव्यपथावरील आजच्या परेडला सुरुवात केली. याआधी कर्तव्यपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे स्वागत केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ध्वजारोहण केले. कर्तव्यपथावरील परेडचे सुरुवात कलाकारांनी 112 वाद्ये वाजवून केली. यानंतर MI-17 हेलिकॉप्टर हवाई कसरतींचे प्रदर्शन केले. राष्ट्रध्वजासह नौदल, लष्कर आणि वायुसेनेचे झेंडे फडकवत परेडचे सुरुवात करण्यात आली.
विशेष म्हणजे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्तव्यपथावरील परेडची सुरूवात 100 हून अधिक महिला कलाकारांनी भारतीय वाद्ये वाजवून केली. पारंपारिक वाद्यांच्या मदतीने या परेडची सुरूवात करण्यात आली. या वाद्यांमध्ये नगाडा, शंख, नादस्वरम, ढोल-ताशा यांचा समावेश होता.
https://twitter.com/ANI/status/1750748577549463728
महिलांच्या वाद्य पथकामध्ये महाराष्ट्रातील चिपळूणचे विघ्नहर्ता महिला वादक पथक सहभागी झाले होते. या महिला वादक पथकाने शंख, ढोल-ताशा ही वाद्ये वाजवत या परेडची सुरूवात केली. सध्या, महिलांच्या या परेडचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.