भारत आज आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ध्वजारोहण करून आजच्या परेडला सुरुवात करण्याची परवानगी दिली. त्यानुसार पहिल्यांदा MI-17 हेलिकॉप्टर हवाई कसरतींचे प्रदर्शन केले. राष्ट्रध्वजासह नौदल, लष्कर आणि वायुसेनेचे झेंडे फडकवत परेडची सुरुवात केली. त्यानंतर अनेक रेजिमेंटच्या बँड पथकांनी, डीआरडीओने तयार केलेल्या आधुनिक टेक्नॉलॉजीच्या पथकाने परेडमध्ये संचालन केले. तसेच यंदाच्या परेडमधील विशेष बाब म्हणजे तिन्ही सैन्य दलांच्या महिला तुकड्या देखील या संचलनात सहभागी झाल्या आहेत. डेंटल कॉर्प्सच्या कॅप्टन अंबा सामंत, भारतीय नौदलाच्या सर्जन लेफ्टनंट कांचना आणि भारतीय वायुसेनेच्या फ्लाइट लेफ्टनंट दिव्या प्रिया यांचा समावेश आहे. अग्नीवर मध्ये निवड झालेल्या महिलांच्या तुकडीने देखील या संचलनात सहभाग घेतला होता.
दरम्यान, आजच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहून हे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आहेत. परेडला सुरुवात झाल्यानंतर सर्वात प्रथम घोडदळाने आणि त्यानंतर T-90 रणगाड्यातील लेफ्टनंट फैज सिंग यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलामी दिली. या रणगाड्याला भीष्म नावानेही ओळखले जाते आणि हे भारतीय लष्कराचे धोकादायक शस्त्र आहे. त्यामागे भारतीय बनावटीचे नाग क्षेपणास्त्र धावत होते.यंदाचा प्रजासत्ताक दिन खास आहे. . दरम्यान ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करून या शुभेच्छा दिल्या. एक्स वरील पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!”