आज देशभरामध्ये ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. राष्ट्रपती द्रौपदी यांनी ध्वजारोहण केल्यानंतर कर्तव्यपथावर भारतीय सैन्य दलांनी चित्तथरारक कवायतींचे प्रदर्शन केले. दरम्यान प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक ठिकाणी प्रमुख मान्यवरांनी ध्वजारोहण केले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी देखील धवजरोहण केले. तसेच देशवासियांना ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपूर येथील संघाच्या मुख्यलयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण केले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त बोधगया येथील आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर येथे ध्वजारोहण केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे आपल्या प्रजासत्ताकाचे चार प्रमुख स्तंभ असल्याचे दत्तात्रेय होसाबळे यांनी आपल्या संबोधनामध्ये सांगितले.
दरम्यान, दिल्लीमध्ये मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. आजच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहून हे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आहेत. परेडला सुरुवात झाल्यानंतर सर्वात प्रथम घोडदळाने आणि त्यानंतर T-90 रणगाड्यातील लेफ्टनंट फैज सिंग यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलामी दिली. या रणगाड्याला भीष्म नावानेही ओळखले जाते आणि हे भारतीय लष्कराचे धोकादायक शस्त्र आहे. त्यामागे भारतीय बनावटीचे नाग क्षेपणास्त्र धावत होते.यंदाचा प्रजासत्ताक दिन खास आहे. . दरम्यान ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करून या शुभेच्छा दिल्या. एक्स वरील पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!’