शास्त्रीय परंपरेनुसार, श्री रामजन्मभूमी मंदिरात आजपासून म्हणजे , २६ जानेवारी २०२४ पासून राग सेवेचे आयोजन करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम रामजन्मभूमी मंदिरासमोरील गुढी मंडपात आयोजित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये देशभरातील विविध प्रांतातील आणि कला परंपरेतील 100 हून अधिक नामवंत कलाकार पुढील ४५ दिवस भगवान प्रभू श्रीरामांच्या चरणी आपली शास्त्रीय रागसेवा अर्पण करणार आहेत. श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्रच्या एक्स अकाऊंटवर याबाबतची सविस्तर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ट्रस्टच्या वतीने या कार्यक्रमाचे संकल्पना व आयोजक श्री.यतींद्र मिश्रा आहेत.
आज पहिल्या दिवशी, प्रभू श्रीराम यांना राग सेवा समर्पित करण्यासाठी, श्रीमती मालिनी अवस्थी त्यांचे सादरीकरण करणार आहेत.
दुसरीकडे प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या दिवसापासून रामललाच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. प्राणप्रतिष्ठेपासून देशाच्या विविध भागात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. सहलींचे आयोजन केले जात आहे. दर्शनासाठी भाविकांचा उत्साह एवढा आहे की वाहतूक सेवाही कोलमडली आहे. प्रशासकीय कारणांमुळे अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहू न शकलेले लोक आता हळूहळू अयोध्येत पोहोचू लागले आहेत.