सध्या प्रसिद्ध गायक राहत फतेही अली खान चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते त्यांच्या नोकराला चप्पलने बेदम मारहाण करताना दिसत आहेत. या व्हिडीओनंतर राहत फतेही अली खान यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
राहत फतेही अली खान दारूच्या बाटलीसाठी नोकराला मारहाण करताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओत ते नोकराचे केस पकडून त्याला चप्पलने बेदम मारहाण करताना दिसत आहेत. मारहाण केल्यानंतर नोकर घाबरून तिथून निघून जात असतो त्यावेळी राहत त्याच्याजवळ जातात आणि त्याला दारूची बाटली कुठे गेली असे विचारतात. यावर नोकर काहीही बोलत नाही.
यानंतर राहत पुन्हा नोकराचे केस पकडत त्याला मारहाण करतात. यावेळी शेजारी उभे असलेले लोक त्यांना थांबवतात, पण ते नोकराला तरीही मारहाण करायचे थांबवत नाहीत. सध्या राहत यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
https://twitter.com/ghulamabbasshah/status/1751266851450179696
अशातच राहत यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ते मारहाण केलेल्या नोकरासोबत उभे असल्याचे दिसत आहे. तसेच व्हिडीओत त्यांनी नोकराची माफी देखील मागितली आहे. ते म्हणाले की, तुम्ही पाहिलेल्या या व्हिडीओत गुरू आणि शिष्य यांच्यातील परस्पर संबंध आहे. गुरू आणि शिष्याचे नाते असे असते ज्यात शिष्य चांगले काम करतो तेव्हा त्याचे कौतुक केले जाते पण शिष्य जेव्हा चूक करतो तेव्हा त्याला शिक्षाही दिली जाते.
पुढे व्हिडीओत नोकर म्हणतो की, व्हायरल झालेल्या व्हिडीओत ज्या बाटलीबद्दल बोलले जात आहे ती दारूची बाटली नसून ते एक पवित्र जल आहे. ते जल मी कुठे ठेवले ते विसरलो होतो. राहत हे आमचे गुरू आहेत ते आमच्यावर खूप प्रेम करतात. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी गैरसमज करून घेतला आहे. आमच्या उस्तादजींना बदनाम केल्याचा प्रयत्न केला जात आहे. पण ते आमच्यावर खूप प्रेम करतात.