बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आले आहे. आज (28 जानेवारी) बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी शपथ घेतली आहे. नितीश कुमार यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे नितीश कुमार हे 24 वर्षांमध्ये नवव्यांदा शपथ घेणारे एकमेव नेते ठरले आहेत.
नितीश कुमार यांच्यासह 8 नेते आज शपथ घेणार आहेत. यामध्ये तीन भाजप नेते, तीन जेडीयू नेते आणि एक एचएएम आणि एका अपक्ष नेत्याचा समावेश आहे.
तर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांना उपमुख्यमंत्रीपद दिले आहे. तर डॉ.प्रेम कुमार भाजपा, विजय कुमार चौधरी जेडीयू, बिजेंद्र प्रसाद यादव जेडीयू, श्रवण कुमार जेडीयू, संतोष कुमार सुमन हम, सुमित कुमार सिंग अपक्ष हे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.