बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आले आहे. आज (28 जानेवारी) बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी शपथ घेतली आहे. नितीश कुमार यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे नितीश कुमार हे 24 वर्षांमध्ये नवव्यांदा शपथ घेणारे एकमेव नेते ठरले आहेत.
एकीकडे बिहारमध्ये एनडीएचे सरकार आले असताना दुसरीकडे सत्ता पडल्यानंतर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या राजीनाम्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बिहारच्या राजकारणात आत्ता कुठे खेळ सुरू झाला आहे, असे तेजस्वी यादव म्हणाले.
नितीश कुमार यांच्या राजीनाम्यावर आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले, “मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, खेळ नुकताच सुरू झाला आहे, अजून खेळ खेळायचा बाकी आहे. मी सांगतो ते करतो, त्यामुळे तुम्ही ते लिखित स्वरूपात घ्या. जेडीयू पक्ष 2024 च्या निवडणूकीनंतर संपलेला पक्ष असेल.”