राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. राज्यसभेतील एकूण १७ राज्यांमधील ५६ सदस्यांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे. तसेच राज्यसभेतील एकूण ६ सदस्यांचा कार्यकाळ देखील संपणार आहे. २९ फेब्रुवारीला राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निकाल जाहीर होणार आहे.
राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण ६ खासदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री.व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. सध्या भाजपमधील राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना पक्ष पुन्हा संधी देणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच सध्या केंद्रात मंत्री असलेल्या नारायण राणे यांना पुन्हा संधी मिळणार की नाही तसेच आताच्या चेहऱ्यानं की नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर त्या गटातील आमदार कोणाला मतदान करणार हा मोठा चर्चेचा विषय आहे. राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया ही २७ फेब्रुवारीपर्यंत सुरु असणार आहे. तसेच यंदा राज्यसभेतून सर्वाधिक खासदार निवृत्त होणार आहे. त्यात सर्वात जास्त निवृत्त होणाऱ्या खासदारांची संख्या ही भाजपाच्या खासदारांचीच आहे. काही राज्यांमधील खासदारांचा कार्यकाळ हा २ आणि ३ एप्रिल २०२४ रोजी संपणार आहे.