हैदराबाद कसोटीत 0-1 असा पराभव पत्करावा लागलेल्या टीम इंडियाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडले आहेत. चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान जडेजाच्या हाताचा दुखापत झाली होती, तर केएल राहुलनेही मांडीच्या दुखापतीची तक्रार केली होती. यानंतर दोन्ही खेळाडूंना वैद्यकीय पथकाने विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
स्टार फलंदाज विराट कोहली 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आधीच रजेवर होता आणि आता आणखी दोन वरिष्ठ खेळाडू सामन्यातून बाहेर पडल्यामुळे संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
बीसीसीआयचे वैद्यकीय पथक दोन्ही खेळाडूंवर लक्ष ठेवणार आहे. तसेच या दोन खेळाडूंच्या जागी आता सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांना स्थान दिले आहे.
टीम इंडियाचा नवा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मुकेश कुमार, सौरभ कुमार.