नौदलाची युद्धनौका आयएनएस सुमित्राने 24 तासांत दोन जहाजांना चाच्यांपासून वाचवले. चाचेगिरीविरोधी कारवाईत तैनात असलेल्या आयएनएस सुमित्राला मदतीसाठी फोन आला. या मासेमारी नौकेत 19 पाकिस्तानी होते. यावेळी समुद्री चाच्यांनी पाकिस्तानी नागरिकांच्या जहाजावर ताबा मिळवला होता. त्यानंतर भारतीय नौदलाने पाकिस्तानी नागरिकांची चाच्यांपासून सुखरूप सुटका केली. गेल्या 24 तासांत INS सुमित्राने 19 पाकिस्तानी आणि 17 इराणींना चाच्यांपासून वाचवले आहे.
28 जानेवारी रोजी, FV Iman नावाचे इराणचा झेंडा असलेलेल मासेमारी करणारे एक जहाज सोमाली चाच्यांनी ताब्यात घेतले होते. या जहाजात 17 इराणी कर्मचारी होते. तर पूर्व सोमालीया किनारा आणि गल्फ ऑफ एडनच्या दरम्यान भारतीय नौदलाने मोहिम राबवून चाच्यांना हुसकावून लावले.
तर दुसरीकडे, समुद्री चाच्यांनी इराणचाच झेंडा असलेले जहाज ताब्यात घेतले होते. या जहाजात 19 पाकिस्तानी कर्मचाऱ्यांना बंधक बनवले होते. यानंतर भारतीय नौदलाने आपली युद्धनौका आयएनएस सुमित्रा पाठवून 19 पाकिस्तानी कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले.
दरम्यान, भारतीय नौदलाचे गेल्या 24 तासातील हे दुसरे यशस्वी मिशन आहे. भारतीय नौदलाचे स्वदेशी गस्त जहाज INS सुमित्रा सोमालियाच्या पूर्वेकडील आणि एडनच्या आखातामध्ये चाचेगिरी विरोधी आणि सागरी सुरक्षा ऑपरेशन्ससाठी तैनात करण्यात आले आहे.