महाराष्ट्र विधानसभेतील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाले आहे. अनिल बाबर यांच्या निधनाने शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनिल बाबर हे सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघाचे आमदार होते. ते खानापूरमधील गर्दी गावाचे सरपंच ते चार वेळा आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास होता. बाबर यांच्या निधनाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. आणि बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
रोखठोक भूमिका मांडण्यासाठी अनिल बाबर प्रसिद्ध होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे खानापूर मतदारसंघात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स या सोशल मीडियावर बाबर यांच्या निधनबाबाबत एक शोकसंदेश शेअर केला आहे. त्या शिंदे म्हणाले, ”आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दांत शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री@mieknathshinde यांनी आ. बाबर यांना #श्रद्धांजली वाहिली आहे. आ. बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेतआ. बाबर यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी, सिंचनासाठी अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी तसेच टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर राजकीय नेत्यांनी देखील अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे आजची मंत्रिमंडळ बैठक देखील रद्द करण्यात आली आहे.