काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली, त्यामुळे कारच्या काचा फुटल्या आहेत.
बुधवारी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बिहारहून बंगालमधील मालदा येथे पोहोचली तेव्हा कोणीतरी मागून हल्ला करत त्यांच्या कारवार दगडफेक केली. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसून कारच्या काचा फुटल्या आहेत.
कारवर हल्ला होताच राहुल गांधी कारमधून खाली उतरले, मात्र हल्लेखोर कोण होते हे अद्याप कळू शकले नाही. याठिकाणी प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन हे देखील कारमध्ये उपस्थित होते, हा हल्ला पाहून त्यांनी विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले आणि त्यांच्यावर हल्ल्याचा आरोप केला.
राहुल गांधींसोबत कारमध्ये बसलेले प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी म्हणाले की, हा हल्ला झाला तेव्हा मागून कोणीतरी दगडफेत करत गाडीवर हल्ला केला. तसेच पश्चिम बंगालमध्ये प्रत्येक टप्प्यावर भारत जोडो न्याय यात्रा रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.