देशामध्ये लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. येत्या १६ जून २०२४ रोजी लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे. याबाबत आता लोकसभा निवडणुकीची तयारी निडवणूक आयोग करताना दिसत आहे. २०१४ पासून देशामध्ये भाजपाचे सरकार आहे. तसेच नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र आता २०२४ च्या निवडणुकीत काहीही करून भाजपाचा पराभव करायचा या मताने देशातील विरोधक एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाने देखील लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यादृष्टीने पक्षाने मुंबईत नवीन योजना अक्षण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा ५ हजार ‘नमो वॉरियर्स’ मैदानात उतरवणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा प्रत्येक महाविद्यालयातून ५० युवक व युवती यांची निवड करणार आहे. असे एकूण ५ हजार जणांना नमो वॉरियर्स म्हणून निवडले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवणे यासाठी हे वॉरियर्स काम करणार आहेत. तर नमो वॉरियर्सना भाजपाकडून मानधन देखील दिले जाणार आहे.
दरम्यान, यंदाची लोकसभा निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. ही लढत एनडीए विरुद्ध ‘इंडिया’ आघाडी यांमध्ये होऊ शकते. भाजपाकडून अब की पार ४०० पार असे लक्ष्य ठेवण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. तर काहीही करून मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही यासाठी ‘इंडिया’ आघाडी प्रयत्न करेल यात कोणतीही शंका नाही. फक्त आता मतदार कोणावर विश्व ठेवतात आणि पुन्हा भाजपाचे सरकार निवडून आणतात की, विरोधकांना संधी देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.