भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम बँकेला मोठा दणका दिला आहे. आरबीआयने पेटीएमला २९ फेब्रुवारीपासून कोणत्याही ठेवी स्वीकारण्यास बंदी घातली आहे. आरबीआयने काल म्हणजेच ३१ जानेवारी रोजी आरबीआयने हे आदेश दिले आहेत. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, समोर आलेल्या काही रिपोर्टनुसार, पेटीएम बँकेने सातत्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. रोपार्टमध्ये आणखीन काही गंभीर गोष्टी आढळून आल्या असून, भविष्यात त्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचे सूतोवाच आरबीआयने केले आहे.
२९ फेब्रुवारी २०२४ नंतर ग्राहकांच्या कोणत्याही खात्यामध्ये प्रीपेड सेवा, फास्टटॅग , वॉलेट्स इत्यादींमध्ये रक्कम जमा करणे. टॉप अप करणे, क्रेडिटचे व्यवहार करणे. मात्र व्याज जमा होणे, कॅशबॅक किंवा इतर गोष्टींमध्ये परतावा ग्राहकांच्या खात्यात जमा होईल असे आरबीआयने सांगितले आहे. पेटीएम बँकेवर याआधी कारवाई करण्यात आली आहे. केवायसी नियम मोडल्याप्रकरणी काही महिन्यांपूर्वी पेटीएमला आरबीआयने मोठा दंड ठोठावला होता. २०२१ मध्ये देखील आरबीआयने पेटीएमवर कारवाई केली होती.