बालिकांच्या निःशुल्क लसीकरण मोहिम राबवणार
नवी दिल्ली, ०१ फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, गुरुवारी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात आरोग्याशी संबंधित महत्त्वाची घोषणा केली. लवकरच मिशन-इंद्रधनुष अभियान राबवण्यात येणार आहे. त्यानंतर्गत सर्वाईकल कॅन्सर रोखण्यासाठी देशातील ९ ते १४ वयोगटातील बालिकांचे निःशुल्क लसीकरण करणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली. केंद्र सरकार ९ ते १४ वर्ष वयोगटातील मुलींना सर्वाईकल कॅन्सरची लस मोफत पुरवणार आहे.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य कवच सर्व आशा आणि अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांना देण्यात येईल. माता आणि बाल आरोग्य सेवेबद्दल, सीतारामन म्हणाल्या की, माता आणि बाल आरोग्य सेवेसाठी विविध योजना राबवल्या जातील. अंगणवाड्यांचा दर्जा वाढविला जाईल असे त्नी सांगितले. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) सर्वाइकल कॅन्सर टाळण्यासाठी सर्वाव्हॅक नावाची लस विकसित करेल, जी एचपीव्हीच्या ४ प्रकारांपासून संरक्षण प्रदान करते या लसीची किंमत २००-४०० रुपये प्रति रुपये डोस असेल. सध्या बाजारात गर्भाशय ग्रीवाच्या लसी उपलब्ध आहेत. त्या लसींची किंमत प्रति डोस २,५०० ते ३,३०० रुपये आहे. यापूर्वी सिक्कीम सरकारने २०१६ मध्ये जीएव्हीआय नावाची लस खरेदी केली आणि ही लस ९ ते १४ वर्ष वयोगटातील मुलींना देण्यात आली. आकडेवारी दर्शवते की, सिक्कीम सरकारच्या आकडेवारीनुसार, या कार्यक्रमांतर्गत ९७ टक्के मुलींचे लसीकरण करण्यात आले आहे.