आज (1 फेब्रुवारी) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत 2024-25 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. तर लवकरच लोकसभा निवडणूक होणार असल्याने हा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे. दरम्यान, आता आपण अर्थसंकल्पाबाबतच्या काही खास गोष्टी आहेत त्या जाणून घेणार आहोत.
1. पूर्वी अर्थसंकल्प हा संध्याकाळी 5 वाजता सादर व्हायचा. पण 1999 सालापासून तो सकाळी 11 वाजता सादर व्हायला लागला.
2. निर्मला सीतारमण यांच्याव्यतिरिक्त यापूर्वी केवळ माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महिला केंद्रीय अर्थमंत्री म्हणून 1970 साली बजेट सादर केले होते.
3. 2017 साली रेल्वे अर्थसंकल्प हा मुख्य अर्थसंकल्पातच समाविष्ट करण्याची पद्धत सुरू झाली.
4. मोरारजी देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 10 अर्थसंकल्प मांडले आहेत. तसेच पंतप्रधान मनमोहन सिंग, यशवंत सिन्हा, पी. चिदम्बर यांनी प्रत्येकी 5 अर्थसंकल्प सादर केले आहेत.
5. 2019 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पहिल्या पूर्णवेळ महिला केंद्रीय अर्थमंत्री ठरल्या आहेत.
6. निर्मला सीतारमण यांनी 2020 मधील 2 तास 42 मिनिटांचे सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण वाचून माजी अर्थमंत्री जसवंत सिंह यांचा 2003 चा विक्रम मोडला होता.
7. निर्मला सीतारमण यांच्या आधी जसवंत सिंह यांच्या नावावर सर्वाधिक प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषण करण्याचा विक्रम होता. 2003 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री जसवंत सिंह यांनी 2 तास 13 मिनिटांचे भाषण वाचले होते. जसवंत सिंह यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना हा विक्रम केला होता.