पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल अज्ञात व्यक्तीकडून पोलीस नियंत्रण कक्षाला आला. या फोनमुळे एकाच धावपळ उडाली. पोलीस लगेच पूना हॉस्पिटलमध्ये श्वान पथकासह दाखल झाले. मात्र चौकशी केली असता पूना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रात्री साडे बाराच्या सुमारास अफवेचा हा फोन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या अफवेमुळे रुग्णालयात देखील एकच धावपळ उडाली काही काळ सर्वानाच रुग्णालयामध्ये प्रवेश बंद करण्यात आला होता.
दरम्यान हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा कॉल आल्याने, पोलिसांनी श्वान पथकासह संपूर्ण पूना हॉस्पिटलची तपासणी करण्यात आली. एक तास तपासणी केल्यानंतर बॉम्ब ठेवल्याची माहिती ही अफवा असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण घटनेची पोलीस माहिती घेत आहेत. तसेच हॉस्पिटलशेजारून जाणाऱ्या पुलावरील वाहतूक देखील काही काळ थांबवण्यात आली होती.सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त पूना हॉस्पिटलबाहेर तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण घटनेची माहिती घेतली जात आहे. मात्र ही अफवा नेमकी कोणी पसरवली याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जाणार आहे. तसेच या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करत आहेत. याबाबतचे वृत्त tv 9 मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे.