मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ठाणे शहरातील रूग्णालयात एकनाथ शिंदे यांच्यावर ही शस्त्रक्रिया पार पडली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या डोळ्यांना त्रास होत होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना लेझर ट्रिटमेंटद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. तर शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री शिंदेंवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चष्म्याचा नंबर बदलला होता. त्यानंतर त्यांना जवळचे अंधूक दिसू लागले होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. तर आज सकाळी मुख्यमंत्री शिंदेंनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द करून शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
गुरूवारी संध्याकाळी मु्ख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचा नातू रूद्रांश यांचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केला. त्यानंतर शुक्रवारी त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया ठाण्यातील माजीवाडा येथील एका प्रख्यात डॉक्टरांकडून करण्यात आली आहे.