झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्या प्रकरणातील मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने अटक केली आहे. हेमंत सोरेन यांनी २९ डिसेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला होता. ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सोरेन यांना ९ वेळा समन्स धाडले होते. त्यानंतर बुधवारी म्हणजे काल ईडीने त्यांची तब्बल सहा तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली. दरम्यान हेमंत सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर, चंपई सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र येत्या १० दिवसांत त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यापाठोपाठ हेमंत सोरेन यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.
दरम्यान, झारखंडमधील जमीन घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ईडीने केलेली अटक ही व जारी केलेले समन्स हे बेकायदेशीर असल्याने यातून सुटका व्हावी यासाठी सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. म्हणजेच सोरेन यांनी ईडीच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सोरेन यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने सोरेन यांची याचिका ऐकण्यास नकार दिला. तसे त्यांना झारखंड उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगण्यात आले. दरम्यान, ईडीएन अटक केल्यानंतर सोरेन यांना कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने हेमंत सोरेन यांना ५ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. यामुळे सोरेन यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, तपास यंत्रणांनी राज्यातील कथित बेकायदेशीर खाणकामाच्या मनी लॉन्ड्रींगच्या चौकशीचा भाग म्हणून सोरेन यांचे माध्यम सल्लागार, साहिबगंज जिल्ह्यातील अधिकारी आणि माजी आमदार यांच्या जागेवर छापे टाकले होते.ईडी २०२२ पासून राज्यातील बेकायदेशीर खाणकामातून निर्माण झालेल्या १०० कोटी रुपयांच्या गुन्ह्याची चौकशी करत आहे. तपास यंत्रणांनी आतापर्यंत या प्रकरणात १४ लोकांना अटक केली आहे. ज्यामध्ये २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी छवी रंजन यांचा समावेश आहे. रंजन यांनी राज्याच्या समाज कल्याण विभागाचे संचालक आणि रांचीच्या उपयुक्त म्हणून काम केले होते.