उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी अयोध्या ते 8 शहरांसाठी विमानसेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता देशातील 8 शहरे थेट रामनगरीशी जोडली गेली असून आता रामभक्तांना अयोध्येत येण्यासाठी कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे उद्घाटन केले होते आणि त्याच दिवशी रामलल्लालाही अभिषेक करण्यात आला होता. यानंतर म्हणजेच 23 जानेवारीपासून राम भक्तांसाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले, तेव्हापासून लाखो भाविक रामललाच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचत आहेत. दरम्यान, भाजप सरकार रामभक्तांच्या वाहतुकीची व्यवस्था करण्यात सतत व्यस्त आहे.
गुरुवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 8 शहरांपासून अयोध्येपर्यंत विमानसेवा सुरू केली आहे. यासंदर्भात मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली की, अयोध्येपासून 8 नवीन मार्गांवर हवाई सेवा सुरू करण्यात येत आहे. यामध्ये दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, पाटणा, दरभंगा, मुंबई आणि बेंगळुरू ही शहरे थेट अयोध्येशी जोडली जातील. ही सर्व उड्डाणे स्पाइसजेटद्वारे चालवली जातील.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-अयोध्या-दिल्ली दरम्यानची विमानसेवा बुधवार वगळता दररोज चालेल. तसेच चेन्नई-अयोध्या-चेन्नई ही विमानसेवा दररोज सुरू राहील. तर अहमदाबाद-अयोध्या-अहमदाबाद विमानसेवा बुधवार वगळता दररोज सुरू राहील. यासोबतच मुंबई-अयोध्या-मुंबई विमानसेवाही दररोज चालणार आहे.