मागील महिन्यात २२ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील भव्य राम मंदिराचे लोकार्पण केले. तसेच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठपना देखील केली. या सोहळ्याला हजारो मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. २३ जानेवारीपासून अयोध्येत राम मंदिरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश सुरूवात झाली आहे. २२ जानेवारीपासून आजच्या दिवसापर्यंत म्हणजेच गेल्या ११ दिवसांमध्ये राम मंदिराला सुमारे २५ लाख भाविकांनी भेट दिली आहे. तसेच प्रसाद व देणगी स्वरूपात ११ कोटी रुपये दान करण्यात आले आहेत.
राम मंदिराच्या ट्रस्टचे कार्यालयीन प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ११ दिवसांमध्ये सुमारे ८ कोटी इतकी रक्कम दानपेटीत जमा झाली आहे. तर चेक आणि ऑनलाईन स्वरूपात मिळाली रक्कम ही सुमारे ३.५० कोटी रुपये इतकी आहे. मंदिराच्या गर्भगृहात, जिथे रामलल्ला विराजमान आहेत. गर्भगृहाच्या समोर ‘दर्शन मार्गा’ जवळ चार मोठ्या आकाराच्या दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत, ज्यात भाविक देणगी देतात असे त्यांनी सांगितले.
तसेच भाविक डिजिटल काउंटवर देखील देणगी देतात. देणगी काउंटरवर मंदिर ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते कर्मचारी संध्याकाळी काउंटर बंद झाल्यांनतर दिवसभरात जमा झालेल्या देणगीचा हिशेब ट्रस्टच्या कार्यालयात जमा करतात असे प्रकाश गुप्ता म्हणाले. देणगीत व काउंटरवर जमा झालेले दान मोजण्यासाठी एकूण १४ लोकांची टीम कार्यरत आहे. ज्यात ११ बँकेचे कर्मचारी आणि तीन मंदिर ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच देणगीची रक्कम जमा करणे ते त्याचा हिशेब करणे ही सर्व कामे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली केली जात असे गुप्ता म्हणाले.