मुंबईकरांची प्रतीक्षा आता संपली आहे. वरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या 9 किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 19 फेब्रुवारीला होणार आहे. या कोस्टल रोडचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवारी बीएमसीने मुंबईकरांना याबाबतची माहिती दिली आहे.
वांद्रे वरळी सी लिंक ते मरीन ड्राइव्हला जोडणारा किनारी रस्ता हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा प्रकल्प आहे. साउथ कोस्टल प्रोजेक्ट हा साडेदहा किलोमीटरचा पट्टा आहे जो मरीन ड्राईव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरपासून वरळी वांद्रे सी लिंकपर्यंत जातो.
मुंबईच्या दृष्टीकोनातून लोकांना या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. या रस्त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प दोन भागात विभागला गेला आहे. त्याचे दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे दोन भाग आहेत. यामध्ये दक्षिणेकडील भागाचे काम प्रथम हाती घेण्यात आले आहे.
हा कोस्टल रोड प्रकल्प मुंबई ते कांदिवली दरम्यान सुमारे 29 किमीचा आहे. साउथ कोस्टल प्रोजेक्ट हा साडेदहा किलोमीटरचा पट्टा आहे जो मरीन ड्राईव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरपासून वरळी वांद्रे सी लिंकपर्यंत जातो.