राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ने शुक्रवारी LTTE संघटनेकडून निधी मिळाल्याच्या माहितीच्या आधारावर तामिळनाडू राज्यातील नाम तमिलार कच्ची (NTK) पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या छापेमारी केली व निवासस्थानांची झडती घेतली. ज्या ठिकाणी छापे टाकण्यात आले त्यात NTK कार्यकर्ता आणि YouTuber साताई दुराईमुरुगन आणि इतरांचा समावेश आहे,असे संबंधित सूत्रांनी सांगितले. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) च्या निधीच्या संभाव्य लाँड्रिंगसाठी त्रिची, कोईम्बतूर, शिवगंगा आणि टेंकासी येथील NTK पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले.
एनआयए ज्या प्रकरणाचा तपास करत आहे ती संघटना एलटीटीईच्या पुनरुज्जीवनाशी संबंधित आहे. सूत्रांनी सांगितले सताई दुराईमुरुगन व्यतिरिक्त अन्य नटीके समर्थक आणि यूट्यूबर थेनागम विष्णू यांच्या ठिकाणी देखील एनआयने राज्य पोलीस दलाच्या मदतीने तपास केला. गेल्या वर्षी जून महिन्यात एनआयने भारत-श्रीलंका बेकायदेशीर ड्रग्ज आणि शस्त्रास्त्र व्यापार प्रकरणात तीन भारतीय आणि 10 लंकन नागरिकांसह 13 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, जे एलटीटीई या अतिरेकी संघटनेचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांशी संबंधित होते. त्यांची श्रीलंकेच्या उत्तर भागाला आणि पूर्व भागाला स्वतंत्र तामिळ राज्य म्हणून निर्माण करा अशी मागणी होती.
आरोपपत्रामध्ये समावेश असणाऱ्या आरोपींनी भारत आणि श्रीलंकामध्ये LTTE च्या पुनरुज्जीवनासाठी शस्त्रास्त्रे निधी, जमा करणे आणि साठवण्यासाठी भारत आणि श्रीलंकेतील अवैध ड्रग्सच्या व्यापाराचा फायदा घेण्यासाठी विझिंजम शस्त्रास्त्र प्रकरणातील आरोपींसोबत आरोपपत्र दाखल केलेल्या व्यक्तींनी कट रचला होता.