आज पौष कृष्ण सप्तमी ! स्वामी विवेकानंद यांची तिथीनुसार पुण्यतिथी आहे.
स्वामी विवेकानंद हे एक महान संन्यासी व थोर तत्त्ववेत्ते होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्म म्हणून जगभरात मानाचे स्थान मिळवून देण्याचे व आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते. ते शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत भारताचे प्रवक्ते म्हणून गेले.
आपल्या अलौकिक बुद्धीने, ज्ञानाने आणि वक्तृत्व कौशल्याने त्यांनी जगभरात भारताचे नाव पोचवले. पाश्चिमात्यांचे भारताबद्दलचे आणि हिंदू धर्माबद्दल चे गैरसमज दूर केले. धर्म, कर्म, वेद आणि योग या गोष्टी सोप्या करून समजावल्या.हिंदू सुधारणा चळवळींमध्ये ते प्रमुख होते.
विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. भारतीय तत्त्वज्ञान हे विज्ञान युगात व दैनंदिन जीवनात कसे आचरणात आणता येईल हे त्यांनी सुलभ करून सांगितले. स्वामी विवेकानंदांचे तेजस्वी विचार सर्वांना विशेषतः तरूणांना अतिशय प्रेरणादायक आहेत.
अशा या योगी स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
प्रज्ञा आणवकर, वागेश्वरी शाखा, चिंचवड
सौजन्य -समिति संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत