दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाचव्यांदा अंमलबजावणी संचालनालयाचे समन्स धुडकावले आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना, भाजप नेते हरीश खुराणा म्हणाले की ही फक्त “स्वतःला असहाय्य दाखवण्याची एक युक्ती आहे.”
“पुन्हा एकदा, अरविंद केजरीवाल यांनी ईडीचे समन्स धुडकावले आहे. त्यांनी ईडीचे समन्स वगळण्याची ही पाचवी वेळ आहे. अरविंद केजरीवाल याला बेकायदेशीर म्हणत आहेत, त्यामुळे प्रश्न उद्भवतो की जर समन्स बेकायदेशीर असेल तर ते न्यायालयात जाऊन ते रद्द का केले नाहीत? स्वतःला असहाय्य दाखवण्याची ही फक्त खेळी आहे”, अशी टीका हरीश खुराणा यांनी केली आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण 2021-22 मधील अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात पाचव्यांदा अंमलबजावणी संचालनालयाचे समन्स टाळले आहे. केजरीवाल यांनी आत्ताच्या समन्स पाठोपाठ चौथ्या समन्सचा पाठपुरावा करण्यात आला, जो त्यांनी 18 जानेवारी रोजी टाळला होता.
केजरीवाल यांनी पाचव्यांदा ED समन्स टाळल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय मंत्री मीनाकाशी लेखी म्हणाल्या की, “अरविंद केजरीवाल म्हणजे ‘काम शून्य आणि नाटकच जास्त”, अशी टीका मीनाकाशी लेखी यांनी केली आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाने अरविंद केजरीवाल यांना ईडीने पाठवलेले समन्स बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. “दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत. आम्ही कायदेशीर समन्सचे पालन करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट अरविंद केजरीवाल यांना अटक करून दिल्ली सरकार पाडणे आहे. त्यामुळे आम्ही हे होऊ देणार नाही, असे आपने म्हटले आहे.
केजरीवाल यांनी आतापर्यंत ED ने 18 जानेवारी, 3 जानेवारी, 2 नोव्हेंबर आणि 22 डिसेंबर रोजी जारी केलेले चार समन्स टाळले आहेत आणि त्यांना “बेकायदेशीर आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित” म्हटले आहे. “मला (ईडीने) पाठवलेल्या चारही नोटिसा कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आणि अवैध आहेत. यापूर्वी जेव्हा जेव्हा अशा सामान्य, गैर-विशिष्ट नोटिसा ईडीने पाठवल्या होत्या, तेव्हा त्या रद्द करून कोर्टाने अवैध घोषित केले होते. राजकीय षड्यंत्राचा एक भाग म्हणून नोटिसा पाठवल्या जात आहेत,” असे केजरीवाल चौथी नोटीस वगळल्यानंतर म्हणाले होते.