आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक मुंबईत आज मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या मविआच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे.काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी यासंदर्भातील फोटो पोस्ट केला आहे.
मात्र या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी देशात इंडिया आघाडी संपली असल्याचे वक्तव्य केले आहे.विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसचे नाना पटोले उबाठाचे नेते संजय राऊत हेही उपस्थित होते.इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही. अखिलेश आणि काँग्रेस हे लास्ट पार्टनर राहिले होते ते माझ्या माहितीप्रमाणे दोघेही वेगळे झालेले आहेत. काँग्रेस वेगळी जात आहे शरद पवार गट सुद्धा वेगळा जात असल्याचा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.
या बैठकीत जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाली.खरी मात्र वंचित बहुजन आघाडीला माविआमध्ये सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी वंचित अद्यापही महाविकास आघाडीचा भाग नसल्याचे सांगितले आहे. लोकसभेच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्षात अजूनही चर्चा सुरु आहे.याबाबतचा कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही तूर्तास सध्या आम्ही आम्ही केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. तसेच पुढील आठवड्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते येणार आहेत, त्यानंतर पुढील बोलणी होणार, असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीतील प्रवेशावरून बरीच चर्चा रंगली होती. प्रकाश आंबेडकरांनी आपले प्रतिनिधी म्हणून पाठवलेल्या पुंडकरांनी आपला बैठकीत अवमान झाल्याची तक्रारही बोलून दाखवली होती. या पार्श्वभूमीवर आज मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या मविआच्या बैठकीला प्रकाश आंबेडकरांनी उपस्थिती लावली असून या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
चालू बैठकीतून बाहेर पडताना “मविआ आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये हे आमचे या बैठकीत नक्की ठरले असून आम्ही याबाबतची दक्षता घेणार आहोत.त्यामुळे ताक जरी असले , तरी फुंकून फुंकून प्यायचे असे मी ठरवले आहे.जागावाटप हा आमचा पुढच्या टप्प्याचा मुद्दा असेल.पहिल्या टप्प्यात किमान समान कार्यक्रमाचा मुद्दा आम्ही घेतला असून त्यावर सध्या निम्मी चर्चा झाली असून निम्मी चर्चा बाकी आहे”, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.