पुण्यातील प्रसिद्ध अशा नारळकर इन्स्टिट्यूटमध्ये ‘Creations 2024’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये तिथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रकारचे प्रोजेक्ट्सचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पार पडलेल्या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी आर्किटेक्चर बिल्डिंग, इंटेरिअर डिझाईन मॉडेल्स, फॅशन डिझाईन, आर्ट इंस्टॉलेशन्स, ग्राफिक डिझाइन्स, वेबसाईट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट्स सादर केली.
या प्रदर्शनामध्ये आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्सच्या विद्यार्थ्यांनी भारतीय लष्कर,नौदल आणि वायुसेनेसंबंधित मॉडेल्स सादर केले. त्यात तेजस हे लढाऊ विमान, युद्धनौका आणि अर्जुन रणगाडा ही मॉडेल्स सादर करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मॉडेल्सबद्दल माहिती सांगितली. नारळकर इन्स्टिट्यूटच्या Creations 2024′ प्रदर्शनाला अनेक शाळांच्या विध्यार्थ्यानी भेट दिली व प्रत्येक मॉडेलबद्दल माहिती जाणून घेतली.
दरम्यान, नारळकर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ.महेश अबाळे, H.O.D. राजेंद्र कुलकर्णी, H. O. D सुप्रिया शाळिग्राम, H. O. D. खोडके, प्रा. प्रिया बेलेकर, प्रा. क्रांती कुलकर्णी, प्रा. कृतिका पळशीकर, प्रा. राहुल कुलकर्णी, प्रा. रविंद्र कांबळी, प्रा. अदिती नेर्लेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली विध्यार्थ्यांनी ही मॉडेल्स तयार केली. हे प्रदर्शन लोकमान्य टिळक रस्त्यावरील नारळकर इन्स्टिट्यूटच्या व्होकेशनल विंग या ठिकाणी आयोजित केले गेले होते.