भारतीय जनता पक्षाचे माजी व ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची माहिती ‘एक्स’ या सोशल मीडियावर दिली आहे. पंतप्रधान मोदींनी लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न जाहीर झाल्याबद्दल त्यांच्याशी संवाद साधून त्याचे अभिनंदन देखील केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल ‘एक्स’ या सोशल मीडियावर माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, ””श्री लालकृष्ण आडवाणीजी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे, हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. मी त्यांच्याशी संवाद साधला आणि हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आमच्या काळातील सर्वात राजकारण्यांपैकी एक, भारताच्या विकासात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांचे जीवन हे तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशसेवा करण्यापर्यंतचे आहे. त्यांनी गृहमंत्री आणि माहिती वप्रसारण मंत्री म्हणूनही आपल्या कामाचा ठसा उमटवला. संसदेतील त्यांची कारकीर्द देखील उल्लेखनीय आहे.”