विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहुल नार्वेकर यांच्या नावाने तोतया इसमाने फोनवर पैशांची मागणी केली आहे. आमदारांची परदेशी वारी करणाऱ्या कंपनीकडे नार्वेकरांच्या नावे दोन तोतया इसमांनी पैसे मागितले होते. या प्रकरणी दोन्ही इसमांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदारांची परदेशी वारी करणाऱ्या टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडे काही तोतया लोकांनी राहुल नार्वेकर यांच्या नावे पैसे मागितले होते. नार्वेकरांच्या नावाने तोतया लोकांनी फोनवरून पैशांची मागणी केल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्याला संशय आला. त्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे ही फसवणूक टळली आहे. या प्रकरणी राहुल नार्वेकर यांच्या स्विय सहाय्याकाकडून मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीला विधानसभा आणि विधान परिषद आमदारांना परदेश वारी घडवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. तर या कंपनीच्या कार्यालयात भर दुपारी तीन वाजता दोन इसम शिरले होते. या दोन्ही आरोपींनी राहुल नार्वेकरांच्या नावाने कंपनी कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी केली. तसेच त्यांनी राहुल नार्वेकर यांच्याशी फोनवरून संवाद साधून देण्याचे नाटक देखील केले. धक्कादायक बाब म्हणजे एका आरोपीने फोनवरून नार्वेकरांच्या नावाने कर्मचाऱ्यांशी संवादही साधला.
राहुल नार्वेकरांच्या नावाने फोनवरून तोतया इसमाने पैशांची मागणी केल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्याला संशय आला. त्यानंतर संशय आल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी दोन्ही आरोपींनी कर्मचाऱ्यांना धमकी दिली आणि तेथून पळ काढला. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच राहुल नार्वेकरांच्या स्विय सहाय्यकाकडून मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.