बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कारण अक्षय कुमार हा डीपफेक व्हिडीओचा बळी ठरला आहे. मागील काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी डीपफेकचे बळी ठरताना दिसत आहेत. यामध्ये रश्मिका मंदाना, कटरिना कैफ, सचिन तेंडुलकर, नोरा फतेही या कलाकारांचा समावेश आहे. अशातच आता या यादीत अक्षय कुमारच्या नावाचाही समावेश झाला आहे.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार डीपफेक व्हिडीओचा बळी ठरला आहे. अक्षय कुमारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या बनावट व्हिडिओमध्ये अक्षय कुमार हा एका गेम ॲप्लिकेशनबाबत माहिती देताना दिसत आहे. तसेच त्या गेम अॅप्लिकेशनचे तो प्रमोशन करताना दिसत आहे.
https://twitter.com/Jessely35br/status/1752681354083569876
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एक बनावट व्हिडीओ आहे. अक्षय कुमारने कधीही अशा अॅप्लिकेशनची जाहिरात केलेली नाही. त्यामुळे हा बनावट व्हिडिओ बनवून व्हायरल केल्याबद्दल सायबर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, अक्षय कुमारचा हा डीपफेक व्हिडीओ ज्याने कोणी तयार केला आहे त्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अक्षयच्या टीमच्या वतीने करण्यात आली आहे.